व्यक्तादयो विकुर्वाणा, धातवः पुरुषेक्षया ।

लब्दवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात् ॥१८॥

पुरुषेक्षण झालिया प्राप्त । महदहंकारादि पदार्थ ।

प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्मांडें ॥८८॥

पुरुषावलोकें वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडांतें धरिती ।

यालागीं यातें ’धातु’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८९॥

हें सामान्यतां निरुपण । तुज म्यां सांगितलें आपण ।

जे नाना मतवादी जाण । विशेष लक्षण बोलती ॥१९०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel