विसर्गाद्याः श्मशानान्ता भावा देहस्य नात्मनः ।

कलानामिव चन्द्रस्य कालेनाव्यक्तवर्त्मना ॥४८॥

शुक्लकृष्णपक्षपाडी । चंद्रकळांची वाढी मोडी ।

ते निजचंद्रीं नाहीं वोढी । तैसी रोकडी योगियां ॥१२॥

जन्मनाशादि षड्‌विकार । हे देहासीच साचार ।

आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वें ॥१३॥

घटु स्वभावें नाशवंतू असे । त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे ।

नश्वरीं अनश्वर दिसे । विकारदोषें लिंपेना ॥१॥

घटासवें चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवें नाशप्राप्ती ।

चंद्रमा आपुले सहजस्थितीं । नाश‍उत्पत्तिरहितू ॥१५॥

तैसा योगिया निजरूपपणें । देहासवें नाहीं होणें ।

देह निमाल्या नाहीं निमणें । अखंडपणें परिपूर्ण ॥१६॥

काळाची अलक्ष्य गती । दाखवी नाश आणि उत्पत्ति ।

ते काळसत्ता देहाप्रती । आत्मस्थिती नातळे ॥१७॥

एवं काळाचें बळ गाढें । म्हणती ते देहाचिपुढें ।

पाहतां आत्मस्थितीकडे । काळ बापुडें तेथ नाहीं ॥१८॥

सूक्ष्म काळगती सांगतां । वेगें आठवलें अवधूता ।

सिंहावलोकनें मागुता । अग्निदृष्टांता सांगतू ॥१९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel