मनुष्यास्तु तदा शान्ता, निर्वैराः सुहृदः समाः ।
यजन्ति तपसा देवं, शमेन च दमेन च ॥२२॥
ते काळींचे सकळ नर । सदा शांत निर्वैर ।
समताबुद्धी निरंतर । सुहृन्मित्र परस्परें ॥१८॥
तैं तपें करावें देवयजन । त्या तपाचें मुख्य लक्षण ।
शम-दम साधूनि संपूर्ण । भगवद्भजन स्वयें करिती ॥१९॥
तैं देवाचें नामोच्चरण । दशधा नामीं नामस्मरण ।
तेंचि नाम कोण कोण । ऐक सावधान नृपनाथा ॥३२०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.