कर्मणां परिणामित्वादाविरिञ्चादमङ्गलम् ।

विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥१८॥

करूनि कर्मांचें साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण ।

आदिकरूनि ब्रह्मसदन । नश्वरत्वें जाण अमंगळ ॥८॥

जें ते लोकींचें सुख गहन । तें विखें रांधिलें जैसें अन्न ।

खातां गोड परिपाकें मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥९॥

जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ ।

जे दोन्ही जाण अंतवंत । नाश प्राप्त दोंहीसी ॥२१०॥

काळें पांढरें दोनी सुणीं । जेवीं सम अपवित्रपणीं ।

तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणीं समान ॥११॥

इहामुत्र भोगासक्ती । यांवरी धरावी विरक्ती ।

या नांव `वैराग्यस्थिती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥१२॥

मागील तुझी प्रश्नस्थिती । पुशिली होती माझी भक्ती ।

ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं निजबोधें ॥१३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel