एष तेऽभिहितः कृत्स्नो, ब्रह्मवादस्य सङ्‌ग्रहः ।

समासव्यासविधिना, देवानामपि दुर्गमः ॥२३॥

संक्षेपें आणि सविस्तरें । सांडूनि नाना मतांतरें ।

म्यां सांगितलें निजनिर्धारें । ब्रह्मज्ञान खरें अतिशुद्ध ॥१३॥

तुज सांगितलें करुन सुगम । परी हें ब्रह्मादि देवां दुर्गम ।

जे आलोडिती आगमनिगम । त्यांसीही परम दुस्तर ॥१४॥

तेथें नाना शास्त्रशब्दबोध । वस्तु नेणोनि करिती विवाद ।

जेथ वेदांचा ब्रह्मवाद । होय निःशब्द ’नेति’ शब्दें ॥१५॥

तें हें आत्मज्ञानाचें निजसार । परमार्थाचें गुह्य भांडार ।

मज परमात्म्याचें जिव्हार । फोडूनि साचार सांगितलें ॥१६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel